Be yourself; Everyone else is already taken.
— Oscar Wilde.
This is the first post on my new blog. I’m just getting this new blog going, so stay tuned for more. Subscribe below to get notified when I post new updates.
Be yourself; Everyone else is already taken.
— Oscar Wilde.
This is the first post on my new blog. I’m just getting this new blog going, so stay tuned for more. Subscribe below to get notified when I post new updates.

सामान्यातील असामान्य असे माझे वडील अनेकांचे गाॅड फादर होते. फादर्स डे च्या निमित्ताने त्यांच्या बद्दल थोडेसे ……. व्यक्ती येते आणि जाते पण काही व्यक्ती येतात आणि आजुबाजुला असणार्या सर्वांना भारून टाकतात. त्या जगात असतात तेव्हा जे भारलेपण येते, त्या गेल्या वरही त्यांचे नाव निघाले की तसेच भारलेपण प्रत्येक वेळी येते किंबहुना त्यांच्या संपर्कातील प्रत्येकालाच त्याचा विषय काढावा वाटतो त्यांचे नाव घ्यावे वाटते. माझे वडील अशाच व्यक्तीं पैकी एक !!!
नावाचे म्हणाल तर ज्यांच्या नावात काना, मात्रा, उकार, वेलांटी काही नाही तरी सुद्धा भल्या भल्यांना सहजपणे घेता येणार नाही असे त्यांचे नाव ‘तखतमल’ !वडील म्हणजे धाक असा तो काळ होता, पण भाऊसा( आमचे वडील) फक्त भिती किंवा धाक वाटावा असे नव्हते ते त्या पलिकडचे फार पलिकडचे होते. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक तर होतेच पण त्यांच्या सानिध्यात येणारा प्रत्येक जण त्यांच्या अनोख्या व्यक्तिमत्वातून टपोर्या दाण्यांनी भरलेल्या कणसांच्या शिवारातून दाणे टिपणार्या पक्षासारखा काहीतरी घेऊन जाई.
माझ्या वडिलांचा जन्म १९४२ सालचा. लहानपणी जोर बैठका काढून धारोष्ण दूध पिऊन त्यांनी शरीर कमावले असे ते सांगत. १९७२ च्या दुष्काळाचा परिणाम म्हणून त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील त्यांचे करंजी हे गाव सोडले. व्यवसायाची परंपरा व पिंड असल्याने ते चिंचवडला किराना मालाच्या व्यवसायात बस्तान बसवण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळी त्यांनी केलेले कष्ट आम्हाला अजुनही आठवतात. स्वत: कोणत्याही कामाची लाज न बाळगता चिकाटीने काम करून लवकरच त्यांनी आपला व्यवसाय नावारूपाला आणला. आमचे दुकान चिंचवडच्या प्रसिद्ध मोरया गोसावी मंदीराच्या वाटेवरच होते. दर चतुर्थीला भाविकांची सोय म्हणून नारळ सोलून देण्याचा उपक्रम त्यांनी चालू केला, रास्त दरात नारळ सोलून मिळतो म्हणून दुकानापुढे तोबा गर्दी होई, स्वत: हाताने काम करत करत, चेहर्यावर ओसंडून वाहणार्या ऊत्साहाने, मधून मधून डोके वर काढणार्या आपल्या मिश्किल विनोदी वृ्तीने मोलाचा सल्ला देणारे ‘ मुथाशेठ’ लवकरच चिंचवड गावात लोकप्रिय झाले. समाजकार्याची आवड असल्यामुळे विविध सामाजिक कामांमधे सहभाग घेऊ लागले.
दुष्काळाच्या झळा सोसून गाव सोडलेल्या भाऊसांच्या खांद्यावर स्वत:च्या चार मुली, एक मुलगा यांची जबाबदारी तर होतीच शिवाय वयाच्या ५३व्या वर्षीच त्यांचे वडील म्हणजे आमचे दादाजी गेले होते त्यामुळे घरातील सर्वात मोठा मुलगा म्हणून आपल्या नऊ भावांची आणि तीन बहीणींची सुद्धा जबाबदारी त्याच्या वर होती. अशावेळी सर्वसामान्य माणुस चाकोरी बाहेर काही करण्याचा विचार सुद्धा करु शकणार नाही पण भाऊसा वेगळे हाेते. काहीतरी करण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसुदेत नसे. Quantity Work पेक्षा quality work करायला पाहीजे यावर त्यांचा भर होता. ते फक्त सातवी शिकलेले होते पण आपल्याला ईंग्रजी यायला पाहीजे असे त्यांना वाटे. आठवड्यातून एक दिवस ते इंग्लिश च्या क्लास ला जात . घरी आल्यावर आमच्या बरोबर त्यांचे सराव सत्र सुरु. व्हायचे. उगाचच हाका मारून, come here!, sit down! सारखे आदेश, त्यातून निर्माण होणारा विनोद सगळे वातावरण सैल करून टाके.कोणतीही गोष्ट शिकायला ते नेहमी तयार असत,वयाच्या ४५व्या वर्षी ते १०९ किलो वजन असून पोहायला शिकले. प्रत्येक व्यक्तीला काहीतरी कला अवगत असायला पाहीजे असे त्यांना वाटे. त्यासाठी ते तबला शिकायला जात असत. ताल आणि लय जमली की सगळं जमतं असं ते सांगायचे. पुण्यात अल्लारखाॅ आणि त्यांचे सुपुत्र झाकीर हुसेन यांच्या तबला वादना च्या मैफीलींना जाणे त्यांचे ठरलेले असायचे. संगीताचा आस्वाद घेण्यासाठी दुपारी जेवणासाठी घरी आलेला वेळ ही ते दवडत नसत. घरी आले की आवडीची कॅसेट लावून मगच जेवण करायचे. सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास करणे, माहिती करून घेणे त्याच्या मुळ स्वभावातच होते. शिक्षणातील मोठी पदवी जरी त्यांच्या जवळ नसली तरी त्यांची कुशाग्र बुद्धीमत्ता त्यांच्या जवळच्या ज्ञान भांडाराला सतत वृध्दींगत करत असे.
वाचणाची त्यांना भयंकर आवड होती .ऐतिहासिक कादंबर्या वाचतांना त्यातील प्रसंगांचेवर्णन आम्हाला इतके एकरूप होऊन ऐकवत की अक्षरश: समोर चित्रच उभे रहात असे .सांगण्याची त्यांची हातोटी इतकी विलक्षण होती की लहान मुलांना जेव्हा ते स्वरचित गोष्टी सांगत तेव्हा टाचणी पडली तरी आवाज होईल इतकी शांतता पसरे. मोठ्याना काही ऐकवत असले तर बायका पुरूष, खेडुत, सगळे एकचित्त होत. विनोदांवर हसून हसून पूरेवाट होई. पु. ल. देशपांडे हे त्यांचे आवडते विनोदी लेखक होते.रामायण, महाभारत, रायगडाला जेव्हा जाग येते, राधेय अशी पुस्तक वाचणाची त्यांची साखळी कधीच तुटत नसे. ते इतकं वाचायचे की त्यांच्या जवळचे शब्द भंडार कधी संपायचे नाही. वाचलेला तपशिल ते जसाच्या तसा सांगु शकायचे. पी टी उषा आॅलींपीक मधे कशी धावली सांगतांना ते म्हणायचे उषाचा स्पीड इतका होता की बघणाराला तीचे पाय दिसतच नव्हते. कधी कधी अतिशयोक्ती करून विनोदीपणे चुका आणि दोषांची जाणिव करवून ते समोरच्याला खजिल करत असत. वाचणाची माझी आवड मला त्यांच्या कडून मिळालेला अमूल्य ठेवा आहे. नेतृत्व आणि वक्तृत्व गुण त्यांच्या कडून मला मिळालेली देणगी आहे.
ते स्वत: धाडसी निर्णय घ्यायला कधीच घाबरत नसत, मागेही हटत नसत. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस थ्रीलींग असायचा. आपल्यात जे धाडस, निर्णयक्षमता, बुध्दीमत्ता आहे त्याचा फक्त स्वत: साठी वापर करायचा अशा वृत्तीचे ते नव्हते. म्हणुनच गावाकडून स्वत:च्या नात्यातील व परिचयातील जवळपास चाळीस कुटुंबांना त्यांनी चिंचवड पुण्यात आणले, त्यांचे बस्तान बसवून दिले.जसा त्यांचा परिवार मोठा तसा त्यांचा मित्रपरिवार ही मोठा! मित्रांमध्ये ते खूप प्रिय होते. बदलत्या परिस्थतीचा अंदाज घेवून त्या प्रमाणे पटापट बदल करण्याचा त्यांचा गुण त्यांच्या मित्रांसाठी पण खूप कामाचा ठरायचा. मित्रांच्या सवयी, वागणे, बोलणे, चालणे सगळ्याची ते हुबेहुब नक्कल करत असत. वयाच्या १६व्या वर्षी घरुन पळून जाऊन मुंबईला प्रभात स्टुडिओत ते कामाला राहीले हाेते. मला जर घरच्यांनी परत आणले नसते तर मी तुम्हाला पिक्चर मधे दिसलो असतो असं ते म्हणायचे.
त्यांचा कडक स्वभाव आमचे काही दुखले खुपले तर लोण्याहून मऊ होत असे. ते स्वत:औषध पाणी करायचे. त्यावेळेपुरते ते एकदम वेगळे असायचे.
आपल्या मुली सर्वसामान्य मुलींसारख्या मुळमुळ्या, लाजाळु नसल्या पाहीजे तर त्या खंबीर, कडक आणि कतृत्ववान असल्या पाहीजे असे त्यांना मनापासून वाटायचे. मुलींना गाडी चालवता यायला पाहीजे, त्यांना पोहता यायला हवे, खेळात, स्वसंरक्षात तरबेज असले पाहीजे असे त्या काळी त्यांना वाटायचे. मुलगा मुलगी असा भेद न ठेवता सर्वांच्या प्रगती साठी जे शक्य होईल ते करायला ते तयार असत. मला आठवते चाळीस वर्षांपूर्वी ईटालियन, चायनिज, मेक्सिकन, थाई रेसिपीज् शिकवण्यासाठी आमच्या घरी त्यांच्या परिचयाचे पंचतारांकित हाॅटेल चे शेफ आठवडाभर येत होते. त्याच्या जवळ फार पैसे नसून ते आम्हाला वेगवेळ्या ठिकाणी फिरायला पाठवत असत.फक्त बसपुरते पैसे घेवून आम्ही बहीणी एकदा पुणेकॅम्प मधील दोराबजी माॅल मधे आलो होतो. “घ्यायचे काही नाही फक्त बघायचे” ह्या भाऊसांच्या सूचनेचे तंतोतंत पालन करण्याशिवाय गत्यंतर नसायचे मात्र सगळं माहीत असायला पाहीजे, नजर तयार असली पाहीजे,कुठेही गेले तरी बुजता कामा नये हे त्यांचे म्हणणे किती खरं होतं ते आता पटते. आमच्या आईला संगितात रस नसूनही ते तीला संगीत नाटकांना घेऊन जात असत. माझ्यातील वक्तृत्व गुण ओळखून ते मला प्रसिद्ध वक्त्यांच्या सभांना भाषण ऐकायला घेवून जात. काळाची गरज ओळखून तसं प्रशिक्षण घेतलं पाहीजे असा सल्ला ते तरुणांना देत असत.
भाऊसांनी आम्हा भावंडांसाठी ठेवलेला अमुल्य वारसा कधीही न संपणारा, शाश्वत आहे. कडक, करारी असे त्यांचे व्यक्तिमत्व, स्पष्ट, सडेतोड बोलण्यात कुणीही हात धरू शकणार नाही असे होते. ते भावना प्रधान होते पण भावनेच्या आहारी जाणारे नव्हते. व्यापारी वृत्तीचे हाेते पण लबाडी करुन नफा कमावणारे नव्हते. धर्मपरायण होते पण अंधश्रद्धाळू नव्हते. प्रेमळ होते पण आंधळे प्रेम करणारे नव्हते. राजकारणी होते पण स्वार्थी नव्हते. पांढरे स्वच्छ कडक कपडे,कुणाकडे जर नुसते पाहिले तरी त्याने वाट करुन द्यावी असा त्यांचा रुबाब होता.
भाऊसांच्या आठवणी शिवाय एकही दिवस जात नाही. कठीण प्रसंगी त्यांचे शब्द आठवल्याशिवाय रहात नाही. जेव्हा जेव्हा आम्ही भाऊ- बहीणी एकत्र जमतो अजुनही त्यांचे विनाेदआठवून तासभर खळखळून हसतो.प्रत्येक आनंदाच्या प्रसंगी ते आठवतात . त्यांचे शब्द आठवून अडचणींतून आपोआप मार्ग सापडतो. प्रत्येक जबाबदारी पेलतांना बळ मिळते.
धावपळीचे , दगदगीचे आयुष्य जगतांना स्वत:च्या शरीराची म्हणावीशी साथ त्यांना मिळू शकली नाही. वाढते वजन, मधुमेह, रक्तदाब यामुळे ते लवकर गेले. त्यांच्या आठवणी मात्र अजुन ताज्या आहेत. त्यांना शब्दरूप देण्याचा हा छोटासा प्रयत्न करतांना कवितेच्या या ओळी नकळतच आेठांवर येतात
हातामधे माती घेऊन तिला तुम्ही पंख दिले,
आमच्या कोवळ्या ओठांमधे मांगल्याचे मंत्र दिले,
मचे शब्द आमच्यासाठी वेदांताचे सुक्त झाले,
तुमचे छत्र आमच्यासाठी सुदर्शन चक्र झाले!!
लहानपणी रस्त्याने भिरभिरे विकायला येणारा नेहमी दिसायचा. त्याच्या हातातएक मोठी दांडी असायची.त्याला रंगीबेरंगी कागदाचे भिरभिरे लावलेले असायचे. वार्याचाअंदाज घेवून तो असा काही उभा रहायचा की हातातल्या सगळ्या भिरभिर्यांची गरगर फिरण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे असे वाटावे एखादे चक्र कमी गतीने फिरले तर त्याचे रंग ,आर्कषकता जाणवायची पण फिरणे आणि फिरणे, वेगाचे फिरणे एवढेच जणू त्या चक्राला माहीत¡ अगदी बिघाड होई पर्यंत ,तुटून जाईपर्यंत तो काही थांबायचे नाव घेत नसे¡ आमच्या आयुष्याची स्थिती सुद्धा थोड्या फार फरकाने त्या भिरभिर्यासारखीच झाली होती. सगळे फिरतात म्हणून फिरतच रहायचे अगदी न थांबता तुटे पर्यंत ,फाटेपर्यत. आणि एक दिवस वाराच थांबला … पुर्णपणे थांबला¡तेव्हा मात्र आमच्या पायाखालची वाळू सरकली.संकटांशी दोन हात करण्याचा हातखंडा असणारे
आमच्यातले भलेभले पण थंडावले ,विसावले ,शांत झालें .मोठा कारभार बाजुला ठेऊन घरातल्या पीठामीठाची काळजी करू लागले घरातल्या पोळीवाल्या बाई आणि मावशी येईनाश्या झाल्या आणि बाईसाहेबांनी पदर खोचला.बरेच बरेच दिवसांनी कणिक तिंबायला घेतली. पीठाचा मऊ स्पर्श हातांना हवासा वाटला.
घाईघाईने डबे भरून कामाला धावणार्या सगळ्या जणी घरात हळुवार अलगद हिंडायला लागल्या. कुंडीतल्या फुलाला गालात हसून निरखू लागल्या.गरम वरणभाताचा सुवास नाकात साठवु लागल्या. नव्या नव्या आई झालेल्या घरात राहून आईपण अनुभवू लागल्या.रजा संपून कामावर रूजु झाल्या तेव्हा त्यांच बाळ नुकतच हसायला लागल हाेत. मधल्या काळातल त्याच बालपण निसटल होत. पण आता मात्र सकाळी सकाळी त्याच्या बाेबड्या आवाजातल्या गोष्टी पाळणा घरातल्या मावश्या नाही तर चक्क आई बाबा बसून ऐकत होते.
तिला आरश्या समोर उभे राहून तयार होतांना शेवटी कधी पाहीलं हे सुद्धा त्याला आठवलं नसतं, हल्ली मात्र तो योग रोज येत होता
कंटाळा आला म्हणून का होईना रिटायर बाबांसोबत बुद्धीबळ , कॅरम खेळतांना तो पुन्हा बाळपणीचा त्यांचा सहवास अनुभवत होता.
घरातल्या कामात बायकोला मदत करतांना आज बरेचवर्षांनी हातात केरसुनी आली .लादी पुसल्यावर आेल्यावर पाय का द्यायचा नाही हे मात्र पक्के समजले.
साधे जेवण सुग्रास वाटू लागले.स्वीगी झोमॅटो गायब असल्याने कांदा कापून दिल्यावर मिळणारे गरम पोहे फारच टेस्टीं असतात हे घरातल्या तमाम ताई वर्गाला कळाले तर थालीपीठ खरचं खमंग असते हे सगळ्या दादांना समजले.कामात मदत करता करता वेळात वेळ काढूनआपले छंद जोपासतांना सगळ्यांना खूप भारी वाटत होते . सगळे एकत्र होते, वाद होता होता संवाद कधी सुरु झाला ते कळालेच नाही.एकमेकांची काळजी घेतांना , रोजच्या धावपळीमुळे आलेला काेरडेपणा जावुन स्नेहाळ मऊ नाती पुन्हा नव्याने एकत्र आली.सकाळचा चहा संध्याकाळची दिवेलागण सारं सारं कुटुबातले फक्त म्हातारेच नाही तर सगळे अनुभवत होते.
प्रत्येक विकएंडला कुठेतरी जायंच म्हणजे जायचंच ,नविन लागलेला प्रत्येक मुव्ही बघायचाच,सेल लागला की गरज असो किंवा नसो माॅल कडे धाव घ्यायचीच,आणि मोठ्या सुट्टया वेस्ट न करता स्मार्टली प्लॅन करायचे ,ट्रीप व्हायलाच पाहीजे असे तीचे एक नाही अनेक हट्ट शिशीरातल्या पानगळीसारखे गळून गेले होते अगदी तिच्या नकळत¡
मुलांच्या वाढदिवसाला सकाळी सकाळी घरभर ओव्हन मध्ये बेक करायला ठेवलेल्या केक चा वास दरवळला ,वासानेच पोट भरते की काय असे वाटावे इतका ¡ केक आणि बर्थडे बाॅय दोघेही घरातल्या सर्वासोबत हसत खेळत दिवस होते. मागच्या दोन चार वर्षात क्लासच्या मित्रांना,शाळेच्या मित्रांना पार्टी देता देता घरचा केक खायचा राहून जात होता हे जाणवलं बर्थ डे बाॅयला ¡
सासरी गेलेली मुलगी आणि आई मध्ये सुद्धा अाज काय स्वयंपाक केला ,असे नाॅर्मल संवाद घडत होते. सासुच्या तक्रारी करण्या पेक्षा लेक् आईलातु तुझी काळजी घे ग,असं आठवणीने बजावत होती .
नित्यनियमाने येणारे वर्तमान पत्र येईनासे झाल्यावर त्याची उणीव भासू लागली बरेचवेळा ते न वाचता रद्दीच्या गठ्यातजायचे तरीही …
सगळं सगळं थांबल होतं………मात्र बरचं थांबलेलं पुन्हा नव्याने सुरु झाले होते ……या सगळ्यासाठी उपाय मात्र मोठा जालीम करावा लागला हे ही खरचं……
Thank you Corona.
बंगल्याचं बांधकाम बघायला जायचे म्हणून रिया एक्साइटमेंट मध्ये आवरत होती . घरातले सगळं जिथल्या तिथे झाल्या शिवाय तिचा पाय निघत नसे. हे अगदी नेहमीचंच होतं. तीची धावपळ चालू होती . सुशिला मावशी पण आज लवकरच आल्या होत्या. बाईसाहेबांच्या मर्जी प्रमाणे कामव्हायचे तेही पटपट म्हणून जरा धास्तीने उरकत होत्या . रिया स्वच्छतेची फारच भोक्ती घरात आणि घरातल्या सर्वांवर तिच्या स्वच्छतेचा हुकुम चालत असे. तिच्या म्हणण्याखातर कधी कधी रितेशला उगाचच डेटाॅल ने हात धुवावे लागत . छोटा रिंकु तर कायम कशानकशासाठी तिचा धपाटा खात असे. रिंकु जवळ एखादा डास जरा दिसलातरी तिचा जीव खालीवर होत असे. ती सतत त्याचे बुट कपडे ,खाणेपीणे यासगळ्यांनच्या बाबतीत जागरूक आणि दक्ष अस. एवढ करूनही रिंकु सतत सर्दी खोकल्याने जाम असायचा जरारूटीनबदलले
की त्याचा ताप ठरलेला ,रिया त्याच्या खाण्यापीण्याच्या बाबतीत बिलकुल काम्प्रोमाईज करायला तयार नसायची . मुलांच्या शरिराला काय काय आवश्यक यावर सतत गुगल करत असायची.मैत्रीनींच्या किटीत तर यावर कधी कधी तासन् तास गप्पा व्हायच्या . सगळ्याजणी रियाचे तोंडावर कौतुक करायच्या मागे मात्र उडवायच्या . तर अशी ही रिया .सेकंड होमची रितेशला भारी हौस,म्हणूनच डोणज्याला बंगल्याचे काम चालू होते ते बघायला चल म्हणून बरेच दिवस तो रियाच्या मागे लागला होता आत्ता कुठे त्याला मुहुर्त लागला होता.मात्र रिंकु घरीच राहणार होता. त्याच्या लाडक्या आजी जवळ ¡ आज मनसोक्त खेळायला मिळणार म्हणून तो खुशीत होता. त्याला बर्याच सूचना देऊन रिया गाडीत बसली.
रिया रितेश डोणज्याला पोहोचले.कुठ काय कसं करायचं यावर रितेश भरभरून बोलत होता.रिया मात्र नाकावर रुमाल लावून हं,हुं करत जपत सावरत चालली होती.बांधकामावरचे मजुर नेटाने काम करत होते ,बायका आठ आठ विटा घेऊन वरती चढत होत्या. मजुर बायकांची लहानगी मुलं सावलीला खेळत होती.त्याच्यातली अगदी लहानगी दोन अडीच वर्षांची मुलगी भुकेची वेळ झाल्याने आईला शोधत होती.आईचे तीच्या रडण्याकडे बिलकुल लक्ष नव्हते.रडता रडता मुलगी जवळच् बांधलेल्या कुत्र्याच्या पिलाकडे गेली आणि भूक विसरून त्याच्याशी खेळ ण्यात गुंतली. तीचे टपोरे डोळे, कुरळे केस, गुटगुटीत बाळसे सगळेच रियाचे लक्ष वेधून घेणारे होते. रिया सगळं पहात होती.रितेशने एक पामेरियन कुत्र्याचे पिलु आणले होते.त्याची देखभाल अर्थातच मुकादम करत होता.काही वेळाने त्याने घड्याळात बघितले आणि आऊटहाऊसला जाऊन कुत्र्यासाठी चपाती आणली.डाॅगीची कलरफुल वाटी आणि मुकादमाच्या हातातील चपाती याकडे मुलगी एकटक पहात होती.चपातीचे तुकडे केलेला वाडगा कुत्र्यासमोर ठेवून तो निघून गेला. छोटी मुलगी मात्र हळुहळु सरकत कुत्र्याजवळ येऊन बसली. एका हाताने कुत्र्याला कुरवाळत होती,आणि दुसर्या हाताने अलगद वाटीतला चपातीचा कुस्करा स्वताच्या तोंडात घालत होती. रिया अनमिष नेत्रांनी द्रुष्य पहात होती. कुत्रा सुद्धा निमुटपणे आपल खाणं त्या चिमुकली बरोबर शेअर करत होता.भान विसरून सारं पाहतांना नकळतच रियाच्या नाकावरचा रुमाल खाली आला. घरी पोहोचल्यावर हातात लाॅलीपाॅप घेवून अनवाणी पायाने बागेत नाचणार्या रिंकुला आज आईच्या धपाट्या एेवजी गोड पापा मिळाला.
तरंग पानावर उतरलेल्या शब्दांचे आणि ओठावर अलगद आलेल्या गाण्याचे,
तरंग अथांग पाण्याशी केलेल्या अवचित खोडीचे ,केलेल्या प्रत्येक कुरघोडीचे,
तरंग वाटेवरच्या व्याकुळतेचे,निरोपानंतरच्या हुरहुरीचे आणि उदास संध्याकाळचे
तरंग शहाणपणा शिकतांना केलेल्या वेडेपणाचे,अजुनही निरुत्तरित प्रश्नांचे
तरंग घुसमटनार्या अंतरंगाचे ,दिल्या घेतल्या हिशोबांचे
तरंग अवचित भरलेल्या हिरव्या श्वासांचे, खुणावणार्या सुखांचे
तरंग मनाचे तरंग मनाचे.
This is an example post, originally published as part of Blogging University. Enroll in one of our ten programs, and start your blog right.
You’re going to publish a post today. Don’t worry about how your blog looks. Don’t worry if you haven’t given it a name yet, or you’re feeling overwhelmed. Just click the “New Post” button, and tell us why you’re here.
Why do this?
The post can be short or long, a personal intro to your life or a bloggy mission statement, a manifesto for the future or a simple outline of your the types of things you hope to publish.
To help you get started, here are a few questions:
You’re not locked into any of this; one of the wonderful things about blogs is how they constantly evolve as we learn, grow, and interact with one another — but it’s good to know where and why you started, and articulating your goals may just give you a few other post ideas.
Can’t think how to get started? Just write the first thing that pops into your head. Anne Lamott, author of a book on writing we love, says that you need to give yourself permission to write a “crappy first draft”. Anne makes a great point — just start writing, and worry about editing it later.
When you’re ready to publish, give your post three to five tags that describe your blog’s focus — writing, photography, fiction, parenting, food, cars, movies, sports, whatever. These tags will help others who care about your topics find you in the Reader. Make sure one of the tags is “zerotohero,” so other new bloggers can find you, too.